RAJ THACKERAY INTERVENES IN VIKHROLI MNS CANDIDATE ROW, CALLS OFFICIALS TO SHIVTIRTH 
महाराष्ट्र

Raj Thackeray: विक्रोळी मनसेत उमेदवारीवरील नाराजी, राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थ बोलावले

MNS Vikhroli: विक्रोळी मनसेत उमेदवारी बदलामुळे निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पक्ष अधिकारी आणि संबंधित कार्यकर्त्यांना शिवतीर्थ येथे बोलावले.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबईत विक्रोळीतील मनसेमध्ये उमेदवारी बदलामुळे निर्माण झालेल्या नाराजी आणि संभ्रमाच्या वातावरणाचा तिढा सोडवण्यासाठी पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी पावले उचलली आहेत. प्रभाग क्रमांक ११९ मधून ऐनवेळी संतोष देसाई यांचा एबी फॉर्म काढून घेऊन विश्वजित ढोलम यांना उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती.

स्थानिक उमेदवार देण्याची मागणी करणाऱ्या संतोष देसाई यांना एबी फॉर्म परत करण्यास सांगण्यात आले, ज्यामुळे पक्षांतर्गत तणाव वाढला होता. या नाराजीनाट्याची माहिती मिळताच राज ठाकरेंनी संतोष देसाई आणि विश्वजित ढोलम यांच्यासह संबंधित पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थ येथे भेट देण्यास बोलावले आहे.

पक्ष नेतृत्व आणि नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून, विक्रोळीतील संभ्रम दूर करून एकजुटीने निवडणुकीची तयारी करण्याचा प्रयत्न आहे. मनसे कार्यकर्त्यांमध्ये आता या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

• विक्रोळी मनसेत संतोष देसाई आणि विश्वजित ढोलम यांच्यात उमेदवारी वाद
• राज ठाकरेंनी शिवतीर्थ येथे संबंधित अधिकारी आणि कार्यकर्त्यांना बोलावले
• पक्ष आतल्या तणाव दूर करून एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न
• नितीन सरदेसाईसह बैठक दरम्यान पुढील निवडणूक रणनीती ठरवली जाणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा