महाराष्ट्र

Raigad Landslide : लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण...; काय म्हणाले राज ठाकरे?

रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथील वाडीवर दरड कोसळली आहे. या घटनेवर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील इर्शाळगड येथील वाडीवर दरड कोसळली आहे. रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला. 100 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी युध्दपातळीवर मदतकार्य सुरु आहे. यामध्ये 27 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेवर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं, असे आवाहनही त्यांनी मनसे सैनिकांना दिले आहे.

खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो, अशी टीकाही राज ठाकरेंनी सरकारवर केली आहे. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, रायगड घटनास्थळी मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल आहे. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या दरडीखाली 100 हुन अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस