विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात.
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व आहे.
या विदर्भाच्या दौऱ्यात राज ठाकरे विदर्भातील विविध विधानसभांचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत. तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत.