थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Raj Thackeray) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. या प्रचाराच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. यातच काल मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
राज ठाकरे यांनी तीन वेगवेगळ्या पोस्ट केल्या असून या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "तुमची जमीन, तुमची भाषा हीच तुमची खरी ओळख, तीच जर पुसली गेली तर तुमचं अस्तित्व ते काय ?". "मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा पद्धतशीर डाव सुरु आहे. आधी पालघर जिल्हा ताब्यात घ्यायचा मग ठाणे जिल्हा घ्यायचा आणि मग असं करत यांना मुंबईपर्यंत यायचं आहे". " ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. ही निवडणूक गेली तर महाराष्ट्र हातातून गेला म्हणून समजा." असे राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Summary
भाषणानंतर राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट
"तुमची जमीन, तुमची भाषा हीच तुमची खरी ओळख"
"ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असा उल्लेख"