Raj Thackeray 
महाराष्ट्र

Raj Thackeray : "सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असली पाहिजे"; मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Raj Thackeray) 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "निवडणुका जिंकायच्या आहेत त्यामुळे जे काही वाट्टेल ते करता येईल त्या सर्व गोष्टी सरकार आणि प्रशासन करत आहे. विरोधी पक्ष नावाची गोष्ट ठेवायचीच नाही. दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत. सरकारने ठरवायचं की कशाप्रकारे निवडणुका जिंकायच्या. पाडू हे जे मशीन आणलं आहे ते कोणत्याही पक्षाला दाखवलं नाही."

"आज तर अजूनच काही वेगळे पाहायला मिळते आहे. आजपर्यंत इंक लावली जायची. आता काय ते नवीन पेन आणलं आहे. याबद्दल इतक्या तक्रारी येत आहेत. तुम्ही बाहेर पडल्यानंतर जर त्याला सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलं आहे. आम्ही आमच्या पद्धतीने जे काही करायचे ते करतोच आहोत. पण ही काही चांगल्या लोकशाहीची लक्षण नाहीत. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असायला हव्यात." असे राज ठाकरे म्हणाले.

Summary

  • 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला

  • "पाडू हे जे मशीन आणलं आहे ते कोणत्याही पक्षाला दाखवलं नाही"

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा