महाराष्ट्र

आज महात्मा गांधी यांची जयंती; राज ठाकरे ट्विट करत म्हणाले...

आज महात्मा गांधी यांची जयंती.

Published by : Siddhi Naringrekar

आज महात्मा गांधी यांची जयंती. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. राज ठाकरे ट्विट करत म्हणाले की, आज महात्मा गांधींची जयंती. 'बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला', असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला 'मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर....' याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं,हे सध्या सुरु आहे.

महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. आणि हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची. या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा.

गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर ७५ वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महात्मा गांधीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. असे राज ठाकरे ट्विट करत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवनातील गोंधळावर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया; "गुंडांना पास कोणी दिले, याचा शोध घ्या....!

shravan 2025 : महाराष्ट्रात 25 जुलैपासून शुभारंभ, चार श्रावणी सोमवारांसह सणांचा महापर्व, जाणून घ्या...

Awhad VS Padalkar : विधिमंडळातील गोंधळानंतर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया, "सभापतींनी गंभीर दखल घ्यावी"