(Raj Thackeray - Uddhav Thackeray ) राज्यात हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. 5 जुलै रोजी मुंबईत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून विविध मंडळांना आवाहन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील दहीहंडी पथक, गणेश मंडळ, नवरात्री उत्सव मंडळ अशा विविध मंडळांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
यातच आता या 5 जूलैच्या मोर्चाची जबाबदारी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही नेत्यांना देण्यात आली आहे. यामध्ये मोर्चासाठी मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यावर जबाबदारी दिला आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय राऊत आणि वरून सरदेसाई यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या मोर्च्यात राजकीय नेते, कलाकार, सामान्य नागरिक, साहित्यिक यांना सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.