महाराष्ट्र

राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर

Published by : Lokshahi News

महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता सक्रिय झाले आहेत. आजपासून राज ठाकरे पुण्यात तीन दिवस मुक्कामी असतील.

शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्याशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत. सकाळी 9 वाजता मनसेच्या शहर कार्यालयात या बैठकांना सुरुवात होणार आहे. आज कसबा पर्वती, हडपसर या तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.

दरम्यान, यापूर्वी राज यांनी नाशिकचादेखील दौरा केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसेनं मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे. खासकरून पुणे आणि नाशिक महापालिकेवर मनसे विशेष लक्ष केंद्रित करून असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."