महाराष्ट्र

रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या ग्रामपंचायतीचा आता पाठिंबा!

Published by : Lokshahi News

राजापूर येथे होणाऱ्या रिफायनरीला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असल्याचं चित्र आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे वर्षभरापूर्वी विरोधात असणाऱ्या राजापूर तालुक्यातील विलेय ग्रामपंचायतीने आता रिफायनरीच्या पाठिंब्याचा ठराव संमत केला आहे. मासिक सभेत हा ठराव संमत करण्यात आला आहे.

त्यानंतर राजापुरच्या तहसिलदारांकडे हा ठराव सुपूर्द देखील करण्यात आला आहे. इतकंच नाही तर ग्रामपंचायतीच्या वतीनं एक पत्र देखील शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे.

यापूर्वी केवळ स्थानिक नेते, पदाधिकारी या प्रकल्पाचं समर्थन करत होते. पण, आता थेट ग्रामपंचायतीकडून रिफायनरीच्या समर्थनार्थ ठराव करण्यात आला आहे. शिवाय विलये दशक्रोशी समर्थन समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता रिफायनरी आणि त्यासंदर्भातील वाढता पाठिंबा याबाबतच्या घडामोडी वेगानं घडत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित

Food In Shravan : श्रावण महिन्यात 'हे' पदार्थ खाणं टाळा; आरोग्य राहील उत्तम

Tripura Student Tragedy : दिल्लीतील यमुना नदीत सापडला त्रिपुरी विद्यार्थिनीचा मृतदेह ; सर्वत्र खळबळ

AI इंजिनिअरची एन्ट्री, भारतीय IT क्षेत्रात खळबळ