महाराष्ट्र

Rajesh Sapte Suicide Case | मुख्य आरोपी राकेश मौर्याला अटक

Published by : Lokshahi News

कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणात आता फरार असलेला मुख्य आरोपी राकेश मौर्या याला आज वाकड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणी आत्तापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

३ जुलै रोजी पुण्याच्या वाकड परिसरात राजेश साप्ते यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. राजेश साप्ते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. तसेच, एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला होता. यामध्ये त्यांनी आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावं घेतली होती. यामध्ये राकेश मौर्या याचे नाव आघाडीवर होते. तसेच तो या घटनेत मुख्य आरोपी होता. या घटनेनंतर चित्रपट सृष्टीतील युनियनकडून कलाकारांची होणारी पिळवणूकीचा मुद्दा चव्हाट्यावर आला होता.

दरम्यान या प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी राकेश मौर्या याला आज वाकड पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरच्या पिंपरी परिसरातील एका हॉटेलमध्ये आरोपी राकेश मौर्या आला असता त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी आत्तापर्यंत ४ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी