महाराष्ट्र

कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर, काय म्हणाले पाहा...

ठाण्यातून अविनाथ जाधव आणि कल्याण ग्रा. राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 24 ऑक्टोबरला दोघही भरणार अर्ज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची उमेदवारी यादी अंतिम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील, आणि ठाणे विधानसभा मतदार संघात मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. कल्याण शिळ रोडवर मानपाडा चौकात राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरी आणि प्रभू श्री रामांची भव्य अशी प्रतिमा भेट दिली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, उमेदवारी यादीवर शेवटचा हात फिरवला जातोय, आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर होईल. त्याआधीच कल्याण ग्रामीणसाठी राजू पाटील आणि ठाणे विधानसभा मतदार संघासाठी अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच येत्या 24 तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा फॉर्म भरण्यासाठी येणार असून तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने फॉर्म भरण्यासाठी यावं असे आवाहन राज ठाकरे यांनी उपस्थितांना केले.

दरम्यान राज ठाकरे ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यासाठी जातात तिकडचे उमेदवारी जाहीर करत असून कल्याण ग्रामीण आणि ठाण्याची उमेदवारी जाहीर केली आहे. तर ही निवडणूक लढण्यासाठी मुद्दे भरपूर आहेत, मुद्दे आणि गुद्दे सोबत घेऊनच निवडणूक लढणार आहे, पाच वर्षात तीन मुख्यमंत्री, दोन तीन राज्यपाल पाहिले आहेत. कोविडमध्ये सुरू असलेलं राजकारण या गोष्टी लोकं विसरलेले नाहीत, त्यामुळे उडालेला बोजवारा, बिघडलेली राजकीय संस्कृती हे सर्व लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mohammed Nizamuddin : अमेरिकन पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय तरुणाचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Earthquake : रशियातील कामचटका येथे 7.8 तीव्रतेचा भूकंप; आता त्सुनामीचा इशारा

Latest Marathi News Update live : मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणींना करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया पूर्ण, अन्यथा...