Rajya Sabha Election 2022 team lokshahi
महाराष्ट्र

Rajya Sabha Election 2022| बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करणार!

राज्यातील 6 राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होणार

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यात तब्बल २४ वर्षानंतर होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप यांच्यात प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या (RajyaSabha) ५७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर दुसरीकडे राज्यसभा निवडणूकित महाविकास आघाडीला पहिला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीची सुंदोपसुंदी वाढत असतानाच आता थेट शिवसेना-भाजपमध्ये (shivsena-bjp) सामना रंगणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. काल (3 मे) राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली असल्यानं आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होणार आहे. शिवसेनेनं दोन, काँग्रेसनं एक, राष्ट्रवादीनं एक आणि भाजपनं तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

मात्र हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटूंबावर सध्या ईडीची देखील टांगती तलवार असल्याने बविआ भाजपला मतदान करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसल्यानंतर शिवसेनेने आपले लक्ष वसई-विरार आणि पालघरकडे वळवले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे तर गेल्या काही वर्षांत पालघर जिल्ह्यातमध्ये चांगलेच सक्रिय झाल्याने बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढत चालली आहे.

वसई-विरार महानगर पालिका निवडणूकीसाठी देखील शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. याचमुळे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी बहुजन विकास आघाडी भाजपला मतदान करण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी