Ramdas Athawale 
महाराष्ट्र

Ramdas Athawale: 'राज ठाकरेंना सोबत घेणं उद्धव ठाकरेंची मोठी चूक', केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य

Thackeray Brothers: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना सोबत घेणं ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने उद्धव ठाकरेंचं नुकसान होणार असून राज ठाकरेंना सोबत घेणं उध्दव ठाकरेंची मोठी चूक असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत एकत्र आल्यामुळे मुंबईतील नॉन मराठी मते महायुतीला मिळतील. मुंबईतील मराठी मते महायुती, काँग्रेस आणि ठाकरे बंधूंना मिळणार आहेत. त्यामुळे मराठी मतात मोठी फूट होणार आहे.

त्याच बरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान होणार आहे. राज ठाकरे यांना सोबत घेण्याची चूक उद्धव ठाकरे यांनी करायला नको होती. राज ठाकरे लोकसभेला आमच्यासोबत होते. तेव्हा आम्हाला काहीही फायदा झाला नाही. विधानसभेला आमच्यासोबत नव्हते, त्यामुळे जास्त फायदा झाला, राज ठाकरे उत्कृष्ट वक्ते आहेत. उत्कृष्ट इव्हेंट मॅनेजमेंट करतात. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते. पण त्यांना मतं मिळत नाहीत, असा टोला देखील रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

सांगलीमधून बोलताना रामदास आठवले म्हणाले की, तसेच उद्धव आणि राज यांची युती झाल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे. त्याचा फायदा आम्हाला महाराष्ट्रात होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना सोबत घेणं ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक असल्याचं म्हटलं आहे.

  • राज ठाकरे यांच्याशी युती करणे उद्धव ठाकरेंची मोठी चूक असल्याचा दावा

  • ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईत मराठी मतांची फूट होईल, असे आठवले म्हणाले

  • अमराठी मते महायुतीकडे वळतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला

  • राज ठाकरे चांगले वक्ते असले तरी त्यांना मते मिळत नाहीत, असा टोला आठवलेंनी लगावला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा