खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधाक खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जीवे मारण्याची कट रचल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राणा दाम्पत्याने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शिवसेना खासदार संजय राऊत, परीवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जीवे मारण्याची कट रचल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीत काय म्हटले ?
आमच्या जीवितास धोका असून आम्हाला काही झालं तर उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब जबाबदार असतील अशी तक्रार राणा दाम्पत्यानी केली आहे. राणा विरुद्ध शिवसेना वाद चिघळण्याची शक्यता आहे.