Navneet rana  
महाराष्ट्र

Navneet Ravi Rana : राणा दाम्पत्यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

संतप्त शिवसैनिकांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या जिल्हाध्यक्ष विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Published by : left

अनिल ठाकरे, चंद्रपूर | शिवसेना (Shivsena) आणि राणा (Navneet Ravi Rana) दाम्पत्यांतील वाद आता फारच टोकाला पोहोचला आहे. हा वाद शमण्याचे नाव घेत नाही आहे. कारण राणा दाम्पत्याला अटक करून सुद्धा शिवसैनिक शांत बसले नाही आहेत. शिवसैनिकांनी चंद्रपुरात राणा दाम्पत्यांच्या (Navneet Ravi Rana) पक्ष कार्यालयाची तो़डफोड केली आहे.

राणा दाम्पत्य (Navneet Ravi Rana) व शिवसेनेमध्ये मागील दोन दिवसांपासून मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्यावरून वाद सुरू आहे.या वादाचे पडसाद राजुरा शहरात पडले असून शिवसैनिकांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयासमोरील पार्टीच्या फलकाची तोडफोड केली आहे.अंदाजे १०० च्या आसपास शिवसैनिक होते व त्यांनी पहिल्या मजल्यावरून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा (Navneet Ravi Rana) यांचे फोटो असलेले फलक खाली फेकून तोडफोड केले.

त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या जिल्हाध्यक्ष विरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य