महाराष्ट्र

पूजा चव्हाण आणि शिवजयंतीवरून राणे बंधूंचे थेट ठाकरे सरकारला आव्हान!

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण तसेच शिवजयंती उत्सवावर लावण्यात आलेले निर्बंध यावरून भाजपा आमदार नितेश राणे आणि भाजपा नेते निलेश राणे या राणेबंधूंनी थेट ठाकरे सरकारलाच आव्हाऩ दिले आहे.

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेलाच आव्हान दिले आहे. 'पूजा चव्हाणबद्दल आवाज उचलल्यावर धमकीचे फोन येत आहेत आमच्या सहकाऱ्यांना.. एखादा कॉल मला ही टाका ना.. मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे.. वाट बघतो आहे!!!' असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

येत्या शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तथापि, करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच यासाठी काही नियमावलीही जारी केली आहे. त्याला भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. 'सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी दरवर्षी प्रमाणे महाराजांच्या मंदिरात अभिषेक करणार आहे. मोठ्या संख्येने माझ्या सोबत शिवभक्त असतील. असेल हिंमत तर ठाकरे सरकारने मला थांबवून दाखवावं, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा