थोडक्यात
वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला लातूरमधून अटक
आरोपींकडून रणजीत कासले याच्याबाबत गुजरात पोलिसांना मिळाली माहिती
रणजीत कासले यास अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू होती
(Ranjeet Kasle Arrest) बीड जिल्ह्यातील बडतर्फ असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले यास मध्यरात्रीच्या सुमारास गुजरात पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतले आहे. दोन दिवसापासून लातूर शहरात रणजीत कासले यास अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
याच्याआधी रणजीत कासले याने सोशल मीडियावर व्हिडीओ करत अनेक खुलासे केले होते. घरफोडी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींकडून रणजीत कासले याच्याबाबत गुजरात पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध घेता रणजीत कासलेला ताब्यात घेण्यात आले आहे.