महाराष्ट्र

भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

Published by : Lokshahi News

भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण न्यायालयाच्या आदेशानंतर पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुलगा अभिषेक लोढा व इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका 54 वर्षीय महिला वकिलाने दिलेल्या फिर्यादीत मंगलप्रभात लोढा यांनी खंडणी व फसवणूक केल्याची माहिती दिली. त्यानुसार न्यायालयाने या संदर्भात आदेश दिल्यानंतर पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यात मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुलगा अभिषेक लोढा, ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड आणि मायक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडचे सुरेंद्रन नायर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. भादवि कलम 384, 385, 406, 420, 120 (ब) 34 या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा