Chhagan Bhujbal Team Lokshahi
महाराष्ट्र

भुजबळ फार्मबाहेर रॅपिड एक्शन फोर्स तैनात! वातावरण तापण्याची शक्यता...

भुजबळ फार्म या छगन भुजबळ यांच्या निवासस्थाना बाहेर पुन्हा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

Published by : Vikrant Shinde

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती मातेवरून केलेल्या विधानानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्‍वभूमीवर सिडको भागातील भुजबळ फार्म या भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येऊन रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे.

छगन भुजबळ यांनी काही दिवसांपुर्वी सरस्वती देवीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपने भुजबळांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलनही केलं. त्यामुळे, भुजबळांच्या विरोधातील आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दोन दिवसांपासूनच पोलिस तैनात:

मागील दोन दिवसांपासूनच छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील सिडको भागातील भुजबळ फार्म या निवासस्थानाबाहेर नाशिक पोलिसांचा बंदोबस्त आहे. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी इथे 24 तास पहारा देत आहेत. मात्र, आता परिस्थिती आणखी चिघळू शकते हे लक्षात घेऊन पोलिसांच्या बंदोबस्तासह रॅपिड एक्शन फोर्सही तैनात करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Earthquake in Alaska : अमेरिकेत भूकंपाचे तीव्र धक्के; आता त्सुनामीचाही दिला इशारा

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मिरा रोडच्या दौऱ्यावर

Rajasthan School Girl: 9 वर्षांच्या मुलीला एका तासात दोन वेळा हृदयविकाराचा झटका

Saamana Editorial : ‘पुणे तिथे गुन्हेच गुन्हे';सामनातून टीका