महाराष्ट्र

‘राहुल गांधी म्हणजे देवाला सोडलेलं गोऱ्हं’

Published by : Lokshahi News

रवी जयस्वाल | राज्यात भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरवात झाली आहे.भाजपचे अनेक नेते आशीर्वाद यात्रेत जनतेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत.जालना जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रा सुरु असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर खालच्या शब्दात टीका केली आहे.

राहुल गांधी म्हणजे एखाद्या देवाला सोडलं गोरं असं म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची खालच्या शब्दात राहुल गांधींवर टीका केली.भाजपची जनआशीर्वाद यात्रा जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये आली असता त्यावेळी दानवे बोलत होते."मी आणि राहुल गांधी वीस वर्ष एकाच सभागृहात बसलो. त्यामुळ राहुल गांधींबद्दल काय सांगावं.एखाद्या देवाला गोरं सोडतो तसे राहुल गांधी… त्याला वेसन घातलेलं नसतं ते कुणाच्या शेतात जावून खातं" असं म्हणत दानवेंची खालच्या शब्दात टीका केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा