( Chandrapur Rain) गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 25 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना आज 25 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.