महाराष्ट्र

पुनर्वसन केलेल्या नागरिकांना हक्काची घरे मिळण्याची टांगती तलवार

मालाड हिल जलाशयाची आरसीसी भिंत कोसळल्यामुळे ३२ नागरिकांना प्राण गमवावा लागला होता

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रिध्देश हातीम | मुंबई : आंबेडकर नगर पिंपरीपाडा येथे २ जुलै २०१९ रोजी मालाड हिल जलाशयाची आरसीसी भिंत कोसळल्यामुळे ३२ नागरिकांना प्राण गमवावा लागला होता आणि ६० हून अधिकजण जखमी झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी १५५ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, सरकार बदलल्यानंतर या निर्देशाकडे दुर्लक्ष झाले आणि फक्त ८४ झोपडपट्टीधारकांना तात्पुरत्या सदनिका माहुल गाव, चेंबूर येथे देण्यात आल्या. दरम्यान, ज्या ७३ झोपडीधारकांचं पुनर्वसन झालं नव्हतं त्यांना महायुतीचं सरकार आल्यानंतर तसेच स्थानिक नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आप्पापाडा मालाड पूर्व येथे सदानिका मिळाली. मात्र, आता या रहिवाशांच्या सदनिकांचा कालावधी पूर्ण झालेला आहे.

जोपर्यंत शासनाकडून पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत दुर्घटनाग्रस्त लोकांकडून सदर सदनिका घेण्यात येवू नये, अशी विनंती करणारे पत्र रहिवाशांतर्फे देण्यात आलेले आहे. मुंबई महानगर पालिका जी नॉर्थ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिगावकर यांची भेट घेवून आंबेडकर नगर, पिपंरी पाडा येथील दुर्घटनाग्रस्त रहिवाशांच्या समस्या मांडल्या.

आंबेडकर नगर, पिपंरीपाडा वनखात्या अंतर्गत राहणाऱ्या ८४ दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना मुंबई महानगरपालिकेतर्फे तात्पुरती घरे माहुल गाव येथे देण्यात आली होती. तब्बल चार वर्षे रहिवासी माहुल गावात राहत असून अशुद्ध पाणी आणि प्रदुषणाचा सामना करत आहेत. दरम्यान, या दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना मालाडमध्ये सदनिका देण्याकरता सहकार्य करावे. तसेच, यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी सर्व रहिवाशांतर्फे पत्र देवून करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा