थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Winter Session ) हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे.
विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत असून विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. मुंबई अधिवेशनात झालेल्या राड्याचा अहवाल तयार झाला असल्याची माहिती मिळत आहे.
पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल तयार झाला असून आज सकाळी विधानसभा अध्यक्षांना अहवाल विधिमंडळ सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पडळकर-आव्हाडांच्या समर्थकांमध्ये राडा प्रकरण
मुंबई अधिवेशनात झालेल्या राड्याचा अहवाल तयार
आज विधानसभा अध्यक्षांना अहवाल देण्यात येणार