महाराष्ट्र

औरंगाबादेत तरुणीची छेड; रिक्षाचालकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Published by : Lokshahi News

औरंगाबादमध्ये भर दिवसा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न झाला. मुलीला रिक्षात बसवून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला असता, तिने धावत्या रिक्षात उडी घेतली. या घटनेनंतर प्रकरण आणखीण वाढल्यानंतर आता छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका रिक्षाचलाका अटक करण्यात आली. औरंगाबादमधील जिंसी पोलीस आणि क्राईम ब्रांचने ही कारवाई केली.

औरंगाबादमध्ये मोंढा नाका ते आकाशवाणी चौकादरम्यान एक तरुणी रिक्षात बसली होती. पण काही अंतरावर गेल्यावर तिला चालकाच्या हावभावावर शंका आली. रिक्षात एकटीच असल्याने तरुणी प्रचंड घाबरली होती. त्यानंतर रिक्षा चालकाचे हावभाव बदलल्यावर तरुणीनं तत्काळ रिक्षा बाजूला घेऊन थांबवायला सांगितले. मात्र तिचे काहीही न ऐकता रिक्षा चालकानं वेगानं रिक्षा चालवायला सुरुवात केली. अखेर छेडछाड किंवा अपहरणाच्या भीतीनं धावत्या रिक्षातून तरुणीने उडी मारली.

दरम्यान आता भर दिवसा एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. आनंद पहुळकर असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. औरंगाबादमधील जिंसी पोलीस आणि क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा