महाराष्ट्र

घरफोडी करणाऱ्या टोळीला घेतले ताब्यात

Published by : Lokshahi News

भूपेश बारंगे, वर्धा
वर्धा शहरात विविध भागात तब्बल पाच घरफोड्या करणाऱ्या टोळीला नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

वर्ध्याच्या लहानुजी नगर येथे घरफोडी झाली होती. घराचे कुलुप तोडून कपाटामधील नगदी 1,20,000 रू. चोरले होते. शहरात वारंवार होणाऱ्या घरफोडीच्या घटना लक्षात घेऊन शोध पथक नेमण्यात आले. पोलिसांनी नागपूर येथे आरोपीचा शोध घेतला. वर्धा पोलिसांनी नागपूर येथे तिघांना ताब्यात घेतले.

तिन्ही आरोपी मध्य प्रदेशातील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी खडकसिंग उर्फ राकेष गुंगा उर्फ रामसिंग अलावा, पारस रतन मंडोई, वेलसिंग दुर्जन बामनीया भिल्ल, मध्य प्रदेश या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."