Rohit Pawar  
महाराष्ट्र

Rohit Pawar : "आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण..."

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Rohit Pawar) कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याच्याआधी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकले होते.आता या व्हिडिओमुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यातच आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत माणिकराव कोकाटे यांचे आणखी 2 व्हिडिओ पोस्ट केलं आहेत.

रोहित पवार यांनी हे व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, 'सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी 42 सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.'

'आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती.'

'विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?' असे रोहित पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Baba Vanga Prediction : समुद्रपातळी वाढेल, धोका, मोठ्या संकटाचा सामना...; 2033 साठी बाबा वेंगाचा इशारा, नेमकी भविष्यवाणी काय? नवीन धोका कोणता?

Gold Rate Increased : सोन्याच्या दरात लाखोंची उडी, सोनं खरेदी करायचं की नाही? ग्राहकांना मोठा फटका

Air India Flight : उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच...; दिल्ली–इंदौर एअर इंडिया फ्लाइटची आपत्कालीन लँडिंग

Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन; धक्कादायक कारण समोर