थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rohit Pawar ) राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली ही शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवला आहे.
या न्यायालयीन निर्णयामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. कायद्यानुसार, दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीत्व कायद्यांतर्गत त्यांचे आमदारपद आणि पर्यायाने मंत्रीपद धोक्यात येऊ शकते.माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, 'माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत?'
यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'गल्लीतील भांडणांची दखल घेऊन विधिमंडळात तात्काळ निर्णय घेतले जातात मात्र आज जेव्हा निर्णय घेणे गरजेचे आहे तेव्हा विलंब का केला जातोय ? माननीय विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत तात्काळ माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करून आदर्श प्रस्थापित करावा...!' असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
Summery
माणिकराव कोकाटे यांच्या रोहित पवारांची प्रतिक्रिया
'विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत?'
'गल्लीतील भांडणांची दखल घेऊन विधिमंडळात तात्काळ निर्णय घेतले जातात'