महाराष्ट्र

रोहित पवार यांनी मतदारसंघातील सिद्धटेकमधील भिमा नदीवरील पुलाचा व्हिडिओ केला ट्विट; म्हणाले...

रोहित पवार यांनी मतदारसंघातील सिद्धटेकमधील भिमा नदीवरील पुलाचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रोहित पवार यांनी मतदारसंघातील सिद्धटेकमधील भिमा नदीवरील पुलाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवार म्हणाले की, हा व्हिडिओ माझ्या मतदारसंघात सिद्धटेकमधील भीमा नदीवरच्या पुलाची आजची स्थिती सांगणारा आहे.

उजनी धरणात मोठ्या प्रमाणात येवा येत असल्याने परिस्थिती गंभीर बनण्यापूर्वीच पाणलोट क्षेत्रातील आणि धरणाखालील नदी काठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची आणि उजनीतील सध्याचा २० हजार क्युसेक हा विसर्ग वाढवण्याची गरज आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी याबाबत संपर्क झाला असून लोक संकटात येण्यापूर्वी शासनाने तातडीने दक्षता घ्यावी आणि लोकांच्या घरात पाणी शिरण्यापूर्वी त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची योग्य ती सोय करावी, ही विनंती. असे रोहित पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Prajakta Mali : 'फुलवंती'चा फिल्मफेअरवर दबदबा, सात पुरस्कार जिंकले

Sanjay Kenekar : खुलताबादचं नाव 'रत्नापूर' करण्याची मागणी ; भाजप आमदार संजय केणेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Pravin Gaikwad : चंद्रशेखर बावनकुळे दीपक काटेचे गॉडफादर असल्याचा आरोप

Latest Marathi News Update live : आजपासून होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण