थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Dhule) 29 महानगरपालिकांमध्ये आज मतदान होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच आता धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावर राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रातील मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक 1 मध्ये शिवीगाळ करत मतदान यंत्रांची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी केल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस उपाधीक्षक अजय देवरेंनी केंद्राची पाहणी केली असून शिवसेना आमदार मंजुळा गावित घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Summary
धुळ्यातील मतदान केंद्रात राडा
'भाजप कार्यकर्त्यांनी केली मतदान यंत्राची तोडफोड'
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांचा आरोप