महाराष्ट्र

ठरलं तर! रुपाली पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Published by : Lokshahi News

अमोल धर्माधिकारी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकांच्या तयारीसाठी दौरे करत असतानाच मनसेच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा देत पक्षाला मोठा झटका दिला होता. त्यानंतर त्या राष्ट्रवादीत अथवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सूरू होती. मात्र अखेर आता रुपाली पाटील यांचे ठरलं आहे. रुपाली पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

मंगळवारी रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी "मला त्या गोष्टी परत परत बोलून वातावरण दूषित नाही करायचे. कारण त्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कोणामध्ये बदल घडत नसेल तर मला तरी स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागेल," अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली.

रुपाली पाटील उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. रुपाली पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद