कुणाल जमदाडे, शिर्डी / अहमदनगर | साईमंदिर बंद होणार असल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या घटनेवर आता साईसंस्थानने अफवांवर भाविकांनी विश्वास ठेवु नये असे आवाहन केले आहे.
शनिवार व रविवारी साईमंदिर बंद असल्याच्या अफवा सोशल मीडियावर फिरत असून श्री साईबाबा समाधी मंदिर शनिवार व रविवार बंद असल्याच्या अफवा अनेक सोशल मिडीयांवर पसरत असून या अफवांवर भाविकांनी विश्वास ठेवु नये. तसेच अद्याप शासनाकडून अधिकृतपणे कुठलेही आदेश संस्थानला प्राप्त झालेले नसुन तसे आदेश प्राप्त झाल्यास अधिकृतरित्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीने जाहीर करण्यात येईल असे आवाहन साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले आहे.