थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(ST Workers) राज्यातील 86 हजार एसटी कामगारांचा पगार रखडला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या वर्षी थकीत देयकांच्या प्रश्नावर एसटी कर्मचाऱ्यांच्या कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेलाच होईल, असे आश्वासन परिवहनमंत्र्यांनी दिलं होते. 7 तारखेपर्यंत पगार देण्याचं परिवहनमंत्र्यांनी आश्वासन दिलं मात्र अद्याप पगाराचा जीआर निघाला नसल्याचे पाहायला मिळत आहे.
जीआर जारी न केल्यामुळे पगार नेमका होणार कधी? असा प्रश्न आता एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Summary
राज्यातील 86 हजार एसटी कामगारांचा पगार रखडला
7 तारखेपर्यंत पगार देण्याचं परिवहनमंत्र्यांचं आश्वासन
मात्र अद्याप पगाराचा जीआर नाही