बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मिळणाऱ्या सततच्या धमक्या आणि बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वांद्रे येथील सलमानच्या घराच्या खिडक्या बदलल्या जात असल्याची माहिती मिळतेय. तसंच सुरक्षेच्या दृष्टीने सलमानच्या घरातील बाल्कनीचंदेखील काम करण्यात आले आहे.सलमानला सतत मिळणाऱ्या धमक्यानंतर त्याच्या घराबाहेर पोलिसांसोबत खासगी सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत.