महाराष्ट्र

”मी समाधान आवताडे शपथ घेतो की…”पंढरपुरच्या नवनिर्वाचित आमदाराने घेतली शपथ

Published by : Lokshahi News

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवले भाजपाचे समाधान अवताडे यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. या शपथविधीला भाजप आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गोपनियतेची शपथ दिली. या विजयामागे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या इतर अनेक नेत्यांचे योगदान आहे. त्यांनी साथ दिल्याने हा विजय झाला, असे अवताडे यांनी सांगितले.

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला. या विजयानंतर समाधान अवताडे यांनी हा विजय जनतेला समर्पित केल्याचे म्हटले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज