महाराष्ट्र

एरोलीमध्ये गुंडशाहीविरोधात अंकुश कदम यांना साथ द्या - संभाजीराजे छत्रपती

एरोलीमधील गुंडशाहीविरोधात स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांना पाठिंबा देण्याचे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अंकुश कदम यांच्या योगदानाची प्रशंसा केली.

Published by : shweta walge

एरोली मतदारसंघात अंकुश कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत संभाजीराजे छत्रपती बोलत होते."स्वराज्य संघटना असताना याठिकाणी मी जेव्हा आलो, तेव्हाच मी तुम्हा सर्वांना शब्द दिला होता की, इथल्या गुंडशाहीविरुद्ध मी तुमच्यासोबत आहे. गुंडशाही मोडून काढण्यासाठी आणि सामान्य लोकांना भयमुक्त करण्यासाठी तुम्ही अंकुश कदम यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत नक्की पाठवाल," असे ते म्हणाले.

"मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जो प्रदीर्घ लढा सुरू आहे, त्या लढ्यात अंकुश कदम माझ्यासोबत कायम कार्यरत आहेत. मराठा समाजाला ५०%च्या आत आरक्षण देण्याची भुमिका घेणारा स्वराज्य पक्ष हा एकमेव पक्ष आहे. इतर पक्ष फक्त आरक्षणाचे गाजर दाखवून राजकारणासाठी मराठा समाजाला आणि इतर समाजाला सुध्दा फसवत आहे आहेत.

माथाडी कामगारांचे प्रश्न आणि काही ठराविक बिल्डरांच्या हितासाठी पर्यावरणाचा विचार न करता चाललेले व्यवहार बंद करण्यासाठी स्वराज्य पक्ष कटिबद्ध आहे, अ, ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा