sambhajiraje  team lokshahi
महाराष्ट्र

मी बांधील असेन तो फक्त जनतेशी; शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट

Published by : Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी शिवसेनेने पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचे आहे.मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील आहे, असे संभाजीराजे (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान , संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला आहे. संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेटही घेतली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीने निवडणुकीत आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती.

मात्र, राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेच्या कोट्यातील असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांच्यापुढे पक्षप्रवेशाची अट ठेवली होती. मात्र, संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढण्यावर ठाम होते. त्यामुळे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता मावळली आहे.

संभाजीराजे राज्यातील मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर संभाजीराजे पुढील भूमिका स्पष्ट करतील. संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवल्यास चुरस निर्माण होऊ शकते. महाविकासआघाडीने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचे ठरवले असले तरी ऐनवेळी संभाजीराजे यांच्या आवाहनला प्रतिसाद देत काही आमदार त्यांच्या पाठिशी उभे राहणार का, हे पाहावे लागेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार