महाराष्ट्र

“हा तर काळा दिवस”… संभाजीराजे भडकले

Published by : Lokshahi News

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यासह सर्वत्रच उत्साहाचं वातावरण आहे. आज रायगडावर पुरातत्त्व विभागाने विद्युत रोषणाई केली आहे. मात्र, ही रोषणाई पाहून खासदार संभाजीराजे छत्रपती हे चांगलेच भडकले आहेत. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, असे त्यांनी ट्वीट केले आहे.

यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी निर्बंध आले आहेत. करोनामुळे शिवजयंती सोहळा साजरा करण्यावर राज्य सरकारकडून काही सूचना आणि नियमावली जारी करण्यात आलेल्या असल्या, तरी सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे.

शिवजन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यासह स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरही रोषणाईचा झगमगाट करण्यात आला आहे. मात्र, भारतीय पुरातत्त्व विभागाकडून करण्यात आलेल्या रोषणाईबद्दल छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा