बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला अखेर गुरुवारी 25 दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्याला जामीन मंजूर (Aryan Khan, Munmun Dhamecha, Arbaaz Merchant granted bail) केला आहे.
आर्यन खानला जामीन मंजूर होताच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' एवढंच ट्विट त्यांनी केलं. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत घेऊन कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज (drugs case) पार्टीत एक दाढीवाला असल्याचा आरोप केला होता. मोठा आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया त्या दिवशी क्रूझवर होता. त्यानेच पार्टी आयोजित केली होती. दाढीवाला असणारा हा माफिया याआधी राजस्थानच्या (rajasthan) जेलमध्ये पण होता, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.
आता हा दाढीवाल कोण आहे? त्याच्याबद्दलची माहिती समोर आली आहे. त्या दाढीवाल्याचे नाव काशिफा खान आहे. तो फॅशन टीव्हीचा MD आहे. त्याने कार्डिलिया क्रूझ वर पार्टी आयोजित केली होती. काशिफाची प्रेयसी रुक्मिणी हुडा हिचे गन बरोबर फोटो आहेत. काशिफाचा रीना बोरॉत बरोबर क्रूझ वरचा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच काशिफ खान यांच्यावर कारवाई करण्यास समीर वानखेडेंनी रोखलं अशी देखील यावेळी माहिती देण्यात आली आहे. "आता परिस्थिती संपूर्णत: बदलली आहे. पिक्चर अभी बाकी है, संपूर्ण सिक्वेन्सच आता बदलला आहे. धरपकड करणारे लोकं आता बचावाचा मार्ग शोधत आहेत, म्हणूनच मी काल पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हटलं." असं नवाब मलिक म्हणाले.