Samruddhi Mahamarg Accident  
महाराष्ट्र

Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 10 ते 12 जणांचा मृत्यू

संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. यात प्राथमिक माहितीनुसार 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

संभाजीनगर | सचिन बडे : संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. यात प्राथमिक माहितीनुसार 10 ते 12 लोकांचा जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वैजापूर जवळील समृध्दी महामार्गावर जांबर गाव टोलनाक्यावर अपघात झाला आहे. उभ्या ट्रकला ट्रव्हलर बस धडकल्याचे समोर आले आहे.

यातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती कळली आहे. हे सगळे लोक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. मृत्यू झालेल्यामध्ये चार महिन्याच्या बालकाचा देखील समावेश आहे. जखमी वर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेमका अपघात कसा झाला, याची चौकशी सुरु आहे. समृद्धी महामार्गावर पोलिसांनी ट्रक थांबवला. दरम्यान ट्रक बाजुला घेत असताना मागून भरधाव वेगाने येणारी बस ट्रकवर आदळल्याचे वृत्त समोर आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर

Dhadak 2 Trailer Out : पुन्हा एक हळवी प्रेमकहाणी; 'धडक 2' चा ट्रेलर लाँच

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल