Samruddhi Mahamarg 
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : मुंबई-नागपूर प्रवास आता होणार सुसाट; समृद्धी महामार्गावरील शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज 5 जूनला (गुरुवार) करण्यात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Samruddhi Mahamarg ) समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज 5 जूनला (गुरुवार) करण्यात येणार आहे. इगतपुरी ते आमणे या 76 किमीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक 35 मीटर रुंद आणि सहा लेन असलेला दुहेरी बोगदा आता लवकरच खुला केला जाणार आहे.

इगतपुरी ते आमणे टप्प्याचं काम एप्रिल पूर्ण झालं पण त्याचे उद्धाटन हे प्रलंबित होते. आजच हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मुंबई - नागपूर प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झाला आहे. आजपासून शेवटच्या टप्प्यातील महामार्ग खुला करण्यात येणार आहे.

701 किमीच्या समृद्धी महामार्गामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईहून नागपूरला आता कमी वेळेत पोहोचता येणार असून या प्रवासासाठी आधी 16 तास लागत होते आता हा प्रवास फक्त 8 तासांत पूर्ण होणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहतील. तसेच मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवळ तसेच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, स्थानिक आमदार, खासदार देखील उपस्थित असतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा