Sandeep Deshpande Team Lokshahi
महाराष्ट्र

Sandeep Deshpande | "शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे"

मनसे संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला उद्देशून केले ट्वीट

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे (maha vikas aghadi) पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी (Dhananjay Mahadik) बाजी मारली. मात्र शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर मनसेच्या संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेला उद्देशून ट्वीट केले.

शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर मनसेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना ही महाविकास आघाडीतील "ढ"टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि "ढ" टीम चे कप्तान तोंडावर आपटले, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

याआधी राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विजय झाला. तर शिवसेनेच्या संजय राऊत यांना ४१ मते मिळाली. सेनेचे संजय पवार फक्त ३३ मते मिळवू शकले. संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक मत बाद ठरविण्यात आले. हे बाद झालेले मत पण शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे होते. एकूण राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेलाच फटका बसल्याचे चित्र आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला उद्देशून ट्वीट केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा