महाराष्ट्र

धक्कादायक! जेपी नड्डा आरती करताना गणेश मंडळाच्या देखाव्याला आग

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका गणेश मंडळाला देखाव्याला आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका गणेश मंडळाच्या देखाव्याला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. साने गुरुजी तरुण मंडळाचा हा देखावा असल्याचे समजत आहे. याचवेळी भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा हे तेथेच उपस्थित होते. दरम्यान, मुसळधार पावसाने आग काही मिनिटांतच विझल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

पुण्यातील साने गुरुजी तरुण गणपती मंडळाने यंदा महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली होती. या मंदिरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आरतीसाठी आले असतानाच मंदिराच्या कळसाला आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. या आगीमध्ये मंदिराचा कळस जळला आहे. या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असतानाच मुसळधार पाऊस आल्याने आग काही मिनिटांतच विझली. या आगीचे कारण अस्पष्ट असल्याचे समजत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा