थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Badlapur MNS) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या बदलापूर मनसेच्या शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
मंत्री आशीष दामले यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केल्याने बदलापूर शहरातील मनसे पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Summary
बदलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मनसेला मोठं खिंडार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विश्वासू राष्ट्रवादी अजित पवार गटात
ऐन महापालिका निवडणुकीत बदलापुरात मनसेला मोठं खिंडार