महाराष्ट्र

Sangli : सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच सांगलीच्या चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी निर्माण झाली आहे. 24 तासांत 172 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती मिळत आहे.

वारणा नदीला सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली असून या ठिकाणी असणारे 11 बंधारे आणि 3 पूल पाण्याखाली गेले आहेत. तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन शहरातल्या पूरपट्ट्यातल्या नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले.

मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ झाली असून चार दरवाज्यातून 8 हजार 886 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असून प्रशासनाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय