महाराष्ट्र

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती

Published by : left

मुंबई पोलीस दलात आता बदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दल आता संजय पांडे यांच्या नेतृत्त्वात काम करेल.

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली झाली आहे. त्यामुळं त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता संजय पांडे यांच्यावर मुंबई पोलीस दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळं संजय पांडे यांच्याकडे आता दुसरी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारनं त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त केलं आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची बदली झाली आहे.हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केलीय.

कोण आहेत संजय पांडे?

संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

पावसाळ्यात गरमागरम बाजरीची खिचडी खा, अनेक फायदे जाणून घ्या

Rohit Pawar : "परप्रांतीय शिक्षकांच्या भरतीतून..." रोहित पवारांचा भाजपला टोला

Pandharpur Accident : पंढरपूरवरून परतताना एसटीचा अपघात, अपघातात जवळपास 30 जण जखमी

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन