थोडक्यात
संजय राऊत यांची तब्येत बिघडली
भांडुपच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल
रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती
संजय राऊत यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत यांना तब्येत बिघडल्याने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भांडुपच्या फोर्टिस रुग्णालयात संजय राऊत यांना अॅडमिट करण्यात आले असून रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टिज हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी केली होती. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मागील आठवड्यात त्यांची अँजिओग्राफी झाल्याची माहिती मिळत असून त्यानंतरही त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. यावेळी त्यांना त्रास जाणवू लागला होता आणि आता त्यांना पुन्हा स्ट्रेस जाणवत असल्याचे डॅाक्टरांचे म्हणणं आहे. आज दिवसभर संजय राऊत यांच्या विविध टेस्ट केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.