महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांच्या मनसे यांच्यात युती होऊन निवडणूक लढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप अधिकृत घोषणा नसली तरी जागावाटपावर चर्चा सुरू आहे. युतीबाबतची घोषणा लवकरच होईल, असे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.
शक्तीप्रदर्शन नक्की होईल. शक्तीप्रदर्शनाची तशी गरज नाही. हा शब्द आमहाला अयोग्य वाटत नाही. जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसांडून वाहताना दिसेल याची मला खात्री आहे. अर्थात जागा वाटप आणि युतीची घोषणा ही कशाप्रकारे करावी पत्रकार परिषदेत करावी की मेळाव्याच्या माध्यमातून करावी त्याच्यावर आमचा निर्णय अचूक आहे.
आता यांना बुडबुडे यायला लागले आहेत. यापूर्वी शिवतीर्थावर अशा सभा फक्त शिवसेनाच करत आली आहे. मग सांगता असेल किंवा सुरुवात असेल या शिंदे गटाचा काय संबंध आहे शिवतीर्थाशी? त्यांना एकदा सांगा. अमित शाहाने पक्ष तुमचा ताब्यात दिला म्हणजे तुमचं शिवतीर्थाशी संबंध नाही. तुम्ही अमित शाहाची टेस्ट ट्यूब बेबी आहात. तुमचा नॅचरल जन्म नाहीये. सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर वैगेरे एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे, तात्पुरता जन्म आहे. तुमची व्यवस्था तात्पुरती आहे. त्यामुळे शिवतर्थावर आम्ही सभा घेणार वैगेरे असे उगाच गर्जना करु नका असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे.
दुसरे भारतीय जनता पक्ष त्यांनी कधी सभा घेतली आहे शिवतीर्थावर. शिवतीर्थाशी संबंध हा ठाकरेंचाच आहे. त्याच्यामुळे आम्ही किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केलेली मागणी जी आहे ही नैतिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या योग्य आहे असेही संजय राऊत म्हणाले.