शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मधून वारंवार भाजपावर हल्लाबोल केला जात असतो. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. 'आगीत तेल ओतण्याचे धंदे त्यांनी बंद करावेत. पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत का, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी आक्रमक झाले होते. पुणे, औरंगाबादसह अनेक जिल्र्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावरून भाजपानंही राज्य सरकारवर टीका केली. या आंदोलनात तेल ओतण्याचा प्रयत्न राज्यातील विरोधी पक्षनेते करत होते पण तेलात भेसळ असल्यानं आंदोलन पेटण्याआधीच विझलं, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
विद्यार्थ्यांना पुढे करून विरोधी पक्ष घाणेरडं राजकारण करत आहे. विद्यार्थ्यांची माथी भडकावून सरकारविरुद्ध लढायला भाग पाडत आहेत. विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये भांडणं लावायची आणि आपण मजा बघायची असं सध्या सरकारचं चाललं आहे, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
आगीत तोल ओतण्याचे धंदे भाजपानं बंद करावेत. पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण विरोधी पक्षासाठी तेल स्वस्त झालं आहे का, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.