Sanjay Raut Team Lokshahi
महाराष्ट्र

'भाजप दाऊद गॅंगच्या लोकांना का वाचवत आहे'

संजय राऊतांचा नवनीत राणा आणि रवि राणांवर निशाणा

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर आज पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील वातावरण बिघडवण्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. डी गँगकडून घेतलेल्या पैशांचा वापर राणा दाम्पत्यानं कुठं केला? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. तसेच भाजप दाऊद गॅंगच्या लोकांना का वाचवत आहे, असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला.

राऊत यांनी म्हटलं आहे की, सवाल राणा दांपत्य अचानक रामभक्त, हनुमान भक्त झाले. मुंबईत धिंगाणा घालू लागले. वातावरण बिघडवू लागले. मात्र त्यांचे डी गँगशी संबंध असल्याचं समोर येतयं. गेल्या 15 दिवसांत जे घडतंय त्यामागे डी गँगचा पैसा लागला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

लकडावाला डी-गँगचा ( Lakdawala D-Gang ) मुख्य फायनान्सर होता. त्याचे आणि राणा दाम्पत्याचे संबंध कसे आहेत? हे समोर आलं आहे. मग ईडीने त्यांची चौकशी का केली नाही? डी गँगसोबत संबंधित लोकांकडून पैसे घेणाऱ्यांची चौकशी का करण्यात आली नाही? अनिल देशमुख, नवाब मलिकांची चौकशी केली. मग राणा दाम्पत्य का सुटलं? त्यांना वाचविणाऱ्या कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती आहे? त्यांची अनेक प्रकरणं आहेत. ती मी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहेत. ते लवकरच पुढे पाठवतील, असंही संजय राऊतांनी सांगितलं.

राणा दाम्पत्यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिणार आहे. कुठल्याही पक्षाने अशा डी-गँगसोबत कनेक्शन असलेल्या लोकांसोबत उभे राहू नये. देवेंद्र फडणवीस का गप्प बसले आहेत? त्यांनी नवनीत राणांसोबत पोलिस ठाण्यात जातीभेद केल्याचं म्हटलं होतं. पण, मुंबई पोलिसांनी व्हिडिओ जारी केल्यानंतर फडणवीस का बोलले नाही? भाजपचे पोपट का बोलत नाही? असे सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी करतात मग याची चौकशी का करत नाहीत. ही सरळसरळ मनीलाँड्रिंगची केस आहे. आता ईओडब्ल्यू नक्की चौकशी करेल. आमची मालमत्ता जप्त केलीत, चौकशी केलीत, आमच्या नेत्यांना अटक केली. मग राणांना का अद्याप वाचवंल गेलं?, याच्या मागे कोण आहे? देवेंद्र फडणवीस आता गप्प का? इतरवेळी पोपटासारखे बोलणारे आता गप्प का बसलेत? असा सवाल त्यांनी केला आहे.

संजय पांडे यांचा महाविकास आघाडीशी संबंध असल्याच्या आरोपावर राऊत म्हणाले की, राणा यांनी पाणी मिळालं नसल्याचा आरोप केला. त्यावर मुंबई पोलिस आयुक्तांनी त्यांना चहापाणी देतानाचा व्हिडीओ व्हायरल केला. आधीचे देखील एक पोलीस आयुक्त भाजपात दाखल झाले आहेत आणि आज त्यांच्या पालख्या उचलतायत ते दिसत नाही? असं राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली