Sanjay Raut team lokshahi
महाराष्ट्र

CM Aurangabad Sabha : औरंगाबादच्या नामांतराची घोषणा होणार का? संजय राऊतांनी सांगितले...

Published by : Shweta Chavan-Zagade

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (8 मे) औरंगाबादमध्ये सभा पार पडणार आहे. या सभेत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु होती. पण यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी औरंगाबादच्या नामांतराचा विषय हा पूर्णपणे सरकारी विषय आहे. त्यामुळं त्यावर मी आत्ता बोलणं योग्य ठरणार नाही असे संजय राऊत यांनी सांगितले.

पण महाराष्ट्र सरकारच्यावतीनं संभाजीनगर अधिकृतपणे व्हावं, शासकीय गॅझेटमध्ये व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडं गेलेला आहे. त्यामुळं केंद्रानं जशी देशातील इतर शहरांची नामांतर तात्काळ केली त्याचप्रमाण हे देखील करावं"

उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे. दोन वर्षानंतर मुंबई बाहेर त्यांची पहिलीच सभा आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही काळात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते कोणालाही निराश करत नाहीत. नक्कीच आज त्यांचं भाषण हे एक मैलाचा दगड ठरेल असं वाटतं, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा